top of page

... مجیب

काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारच्या एका मुस्लिम परिवाराच्या लग्नाला जाण्याचा योग आला... मज्जाच आली म्हणा... हॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही स्थानापन्न झालो तर जावेदभय्य्याचा कलमा वाचणं चालू होतं... कबुली झाली अन दुवाही पढली गेली... "आता काय करायचं असतं?" शेजारच्या काकांचा मला प्रश्न... मी म्हटलं, "काही नाही... आता स्टेजवर जायचं अन त्याला गळाभेट देऊन यायचं"... "तो काही पाया वैगेरे पडेल का?" मी म्हटलं, "नाही ओ,! पाया नाही पडत..." अजून काय बोलावं हे कळेना अन हसावं का हे ही कळेना... "अंकल खाना खाके ही जाना !" असं म्हणत सोहेल जेवण्याच्या हॉलकडे बोट दाखवत म्हटला... जेवण्याच्या हॉलमध्ये गेलो तर नेहमीसारखे ओळीने कुठे लावले होते टेबल? एकाच टेबलाभोवती आठ-आठ खुर्च्या गोलाकार मांडून ठेवल्या होत्या... आम्ही बसलो, अन ताट-वाट्या, काटे-चमचे मांडण्यात आले... मी अन पप्पा एकमेकांशी काहीतरी बोलत होतो त्यामुळे माझा थोडा वेळ टेबलाकडे काही लक्ष नव्हतं..."हं... अब बिस्मिल्लाह किजिये!" असं म्हटलं गेलं अन मी समोर पाहिलं... एका मोठ्या थाळीत चिकन कबाब, ग्रेव्ही अन भली मोठ्ठी बिर्याणी मांडली गेली होती... "झालं का आता, बोंबला तिच्या मायला!" त्या काकांचा उद्गार एकूण माझा जबडा खाली पडायचा राहिला होता... पप्पा अन मी दोघेही व्हेजिटेरिअन असल्याने आम्ही आमचे काटे-चमचे म्यान केले... रेहमान चाचांनी ते पाहिलं अन आमच्या व्हेज बिर्याणीची सोय करून दिली... सुंदर जेवण होतं... झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी सुद्धा ताटाला नमस्कार केला अन उठलो तर आरिफ अंकल गालातल्या गालात हसले... घरी जातानाही ते हसू डोक्यातून जाईना माझ्या...

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

Recent Posts

See All
Deriving from Humour...

अबिश मॅथ्यू आणि कुणाल कामराचा "deconstruction of humour" चा एक video, YouTube वर पाहिला, ज्यात कुणालच्या patriotism and governance च्या set चं deconstruction होतं... Video च्या शेवटाला कुणाल म्हणतो की

 
 
 
Ohh Fuck!...

एक नामवंत लेखिका... तिची फेसबुक Profile मी अक्षरशः तासभर चाळतोय... एकूण एक पोस्ट, कविता आणि wall वर जे काही म्हणून लिहिता येत ते सगळं... Interestingly, तिच्या मुलीचीही profile बघणं होतं... भरपूर फोटो

 
 
 
bottom of page