समष्टीचा नामदेव...
- Kaustubh Savatkar
- Jan 15, 2014
- 1 min read
नामदेव ढसाळ आता आपल्यात राहिले नाहीत... म्हणजे नेमकं काय गमावलं आपण?... आंबेडकरी चळवळीने?... मराठी साहित्य विश्वाने?... एक कार्यकर्ता, एक कवी कि एक पॅन्थर?... नामदेव ढसाळला जाणून घ्यायचं असेल तर "गोलपिठा" वाचावा लागेल पुन्हा एकदा... पण गोलपिठाच का फक्त?... "मूर्ख म्हातार्याने डोंगर हलविले", "तुही यत्ता कंची?", "हाडकी हाडवळा"... आणि मलिका अमर शेख यांचं "मला उध्वस्त व्हायचंय" तर नक्कीच... कदाचित नामदेव नव्याने उमगेल... कामाठीपुऱ्याचा नामदेव, पॅन्थरचा नामदेव, प्रियकर नामदेव, संवेदनशील नामदेव, कवी नामदेव...यातून उरलेला समष्टीचा नामदेव...!

Komentáře