आठवणींचा कोरोना...
- Kaustubh Savatkar
- May 18, 2021
- 1 min read
काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून बसवलेली... आभाळ भरून येतं... आणि मग निथळत राहतं आठवणींच्या पावसासोबत... तू असल्याचा वैशाखवणवा हवा... दूर माझ्या काळजाचं रान जाळून टाकलं होतंस... मग कित्येक वर्षं दुष्काळ पडला... बीज रुजलंच नाही... पाखरं homeless झाली... त्यांना कुठे कळतं एवढं... रानात सर्या पडत राहिल्या... त्यातून वर आल्या मुंगळ्यांच्या प्रजाती... लोभी, खत्रुड, रागीट, द्वेषी, घाबरट... त्यांनी मजबूर केलं रानाला quarantined... तू माझ्यात यायचं नाहीस, मी तुझ्यात... लोकलच्या गर्दीसारखे कधीकाळी ओसंडून गेलो होतो आपण... माझ्या दुष्काळाला तुझ्यातल्या समुद्राशी जोडणारा Sea-link आहे का गं..? करोनाच्या तापासारखा चढावा तुला माझा कैफ... मग उतरेल तुझ्याही छातीत तीच कळ न्युमोनियासारखी...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.